मागील १५ वर्षात पहिल्यांदाच भारती एअरटेल कंपनीला भारतातील कामगिरीतून तोटा सहन करावा लागला आहे. रिलायन्स जिओ मुळे डेटा व व्हॉइस चे दर कपात व इंटरनॅशनल टर्मिनेशन रेट मध्ये कपात झाल्याने कंपनीला तोटा झाला आहे. ३१ मार्च अखेर तिमाहीत रु.६५२.३०/- करोड चा निव्वळ तोटा झाला आहे .मागील वर्षी या कालावधीत कंपनीला रु.७७०.८०/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. आफ्रिकेतील कामगिरीतून मात्र या तिमाहीत कंपनीला रु.६९८.७०/- करोड चा नफा झाला आहे. . डेटा व व्हॉइस दर कपातीमुळे एकत्रित महसुलात १०.५% ची घट झाली असून हि रक्कम रु.१९,६३४/- करोड आहे.तर भारतातील कामगिरीतून महसुलात १३% ची घट झाली असून हि रक्कम रु.१४,७९५.५०/- करोड आहे. २०१७-१८ आर्थिक वर्षात एकत्रित निव्वळ नफा ७१% ने घटला असून हि रक्कम रु. १०९९/- करोड आहे. एकत्रित महसूल १२% घटला असून हि रक्कम रु.८३,६८८/- करोड आहे. इंटरनॅशनल टर्मिनेशन रेट मध्ये कपात झाल्याने भारती एअरटेल, वोडाफोन इंडिया, आयडिया सेल्ल्युलर या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. कॉल रिसिव्ह साठी इंटरनॅशनल ऑपरेटर्स कडून लोकल नेटवर्क ना दिला जाणारा हा दर आहे. १ फेब्रुवारी पासून हा दर प्रति मिनिट ३० पैसे करण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात कंपनीने सर्वाधिक रु.२४,०००/- करोड चा भांडवली खर्च केला आहे.