अदानी पोर्ट अँन्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ३८.९१% ची घट झाली आहे. रु. ६०६/- करोड चा एकत्रित निव्वळ नफा आहे. मागील वर्षी या तिमाहीत रु. ९९२/- करोड चा निव्वळ नफा कंपनीला झाला होता. या तिमाहीत रु. ५७०/- करोड चे फॉरेक्स लॉसेस कंपनीला झाल्याने नफ्यावर परिणाम झाला आहे. मागील वर्षीचे तिमाहीचे तुलनेत निव्वळ विक्रीत घट झाली असून रु.२६०८/- करोड आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण अदानी म्हणाले, २०१८-१९ आर्थिक वर्षात कार्गो व्हॉल्युम मध्ये २०० मिलियन टन्स पर्यंत वाढ करण्याचे ध्येय आहे. ऑटोमेशन व नवीन तंत्रज्ञान , कार्गो मिक्स , कॅपॅसिटी एक्सपान्शन च्या साहाय्याने मार्जिन मध्ये वाढ केली जाईल. तसेच पर्यावरण सौरक्षणास प्राधान्य दिले जाईल. सप्टेंबर अखेर तिमाहीत कार्गो व्हॉल्युम मध्ये २२% ची वाढ झाली आहे. तसेच क्रूड, कोल ,कंटेनर व्हॉल्युम मध्ये ४२%,३५%,१६% अशी वाढ झाली आहे.