एका अहवालानुसार, २०१६ मध्ये ८२,००० करोडपती परदेशात स्थलांतरित झाले असून २०१५ मध्ये ६४,००० लोकांनी स्थलांतरण केले होते. स्थलांतरासाठी ऑस्ट्रेलिया देशाला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. $ १ मिलियन व त्याहून अधिक निव्वळ मालमत्ता असलेल्या व्यक्ती उच्च उत्पन्न गटात येतात. जागतिक संपत्ती व संपत्ती स्थलांतरांबाबत न्यू वर्ल्ड वेल्थ ने दिलेल्या अहवालानुसार, लक्षाधीशानी सलग दुसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलियाला स्थलांतरासाठी प्रथम प्राधान्य दिले आहे. पूर्वी US व UK देशामध्ये स्थलांतरण केले जायचे. यावर्षी ११,००० लक्षाधीश ऑस्ट्रेलिया , १०,००० US तर ३००० लोकांनी UK मध्ये स्थलांतरण केले आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे ऑस्ट्रेलियात असलेल्या सर्वोत्तम हेल्थ केअर सर्विसेस असून चीन , हाँग कोन्ग, कोरिया, सिंगापूर,व्हिएतनाम, इंडिया .सारख्या उदयोन्मुख देशांमध्ये व्यवसायाच्या संधी होत. तसेच कॅनडा, न्यूझीलंड, इस्राईल सारख्या देशांमध्ये देखील स्थलांतरण झाले आहे. फ्रान्स मधून सर्वाधिक लोक स्थलांतरित झाले आहेत. धार्मिक बाबतीत मतभेदांमुळे ते स्थलांतरित झाले आहेत.