भूतानचे पक्षीवैभव – भाग २

आत्माराम परब

भूतानच्या या अफाट पक्षीवैभवामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. भूतान हा पर्यावरणसमृद्ध असा देश आहे. म्हणजे तेथील लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने जंगलाचे प्रमाण किमान ६२ टक्के हवे, पण आज भूतानमधील जंगलांचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे हा देश कार्बन निगेटिव्ह म्हणून ओळखला जातो. अशा ठिकाणी म्हणजेच जेथे पक्ष्यांसाठीचे नैसर्गिक अधिवास इतके समृद्ध असतील तर तेथील निसर्गसाखळीत पक्ष्यांचे प्रमाणदेखील तितकेच समृद्ध होणार हे ओघानेच आले. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा पक्षी म्हणजे ब्लॅक नेक क्रेन.

एरव्ही हा पक्षी तसा दुर्मीळ होत चाललेला, पण भूतानच्या फोब्जिका व्हॅलीमध्ये एकाच वेळी किमान २०० च्या आसपास ब्लॅक नेक क्रेन तुम्हाला अगदी सहज पाहता येतील. या ब्लॅक नेक क्रेनच्या नावाने तेथे एका महोत्सवाचे आयोजन केले जाते. तर कमी पाण्यात किंबहुना पाण्यापासून लांब राहूनच जगणारे ब्लड फेजनट, हिमालयीन मोनाल असे पक्षी अगदी सहज दिसतात. जोडीला कॉलर्ड क्रॉसिबल, पिग्मी कपिवग, यलो रंपेड हनी गाइड, व्हाइट ब्रोड रोझिफच हेदेखील असतात. तर पाण्याशी निगडित ज्यांचा अधिवास आहे असे आयबीज बिल, ग्रेट पॅरोट बिल हेदेखील मुबलक प्रमाणात आढळतात.

अत्यंत आकर्षक असे सृष्टीचं वैभव पाहायचे असेल तर मात्र तुम्हाला भूतानला नोव्हेबर ते मार्च या काळात जावे लागेल. तेदेखील भूतानच्या पूर्व भागात अधिक. िथपू हे तेथील मोठं शहर. तर पारो येथे विमानतळ आहे.

पारोपासून पुनाखा व्हॅली, फोब्जिका व्हॅली, ताशीथांग व्हॅली अशा प्रदेशात खास पक्षी पाहण्यासाठी आपण जाऊ शकतो. काही पक्षी हे तुम्हाला ठरावीक उंचीवरच दिसू शकतात. त्यासाठी चेरेला पासमध्ये जावे लागते. तर भारत-भूतानच्या सीमेवरील मानस राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग भूतानमध्येदेखील येतो. तेथेदेखील मुबलक पक्षीवैभव आहे. किमान धडपड करूनदेखील १०० हून अधिक प्रजातीचे पक्षी अगदी सहजपणे पाहू शकता हेच येथील जैववैविधतेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

Call 093200 31910

info@ishatours.net

Home

geetanjali.ishatour@gmail.com

*ठाणे* – 02225437417, 9320131910

*दादर* – 02224223233, 9320031910

*बोरिवली* – 9324531910

*पुणे* – 9422870773

*कल्याण* – 9619941910

*लेह* – 9320031910

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *